Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 March 2025
webdunia

उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : पवार

उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : पवार
पुणे , बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (11:37 IST)
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा सातार्‍यात चांगलीच रंगली होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केलेला नाही असे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. आम्ही दोन प्रकारच्या बैठका घेतल्या. पहिली लोकसभेबद्दलची आणि दुसरी विधानसभेबद्दलची. या बैठकीत कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही. आम्ही लवकरच सातारा येथील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि ज्यांना लोकसभा लढवायची आहे अशांची बैठक घेऊ आणि खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
 
उदयराजे भोसले यांना उमेदवारी देऊ नये म्हणून राजेंच्या विरोधकांनी पवारांकडे तशी मागणी केली होती. त्यानंतर उदयनराजेंनी पवारांकडे भेटीची वेळ मागितली होती. ही भेट पुण्यात झाली असेही समजते. याचवेळी पवार यांनी राफेल विमान कराराबाबतही आपली भूमिका मांडली. राफेल विमाने देशासाठी उपयोगी आहेत मात्र कितीबाबत मी भाष्य करू शकत नाही. त्या विमानांच्या किती जाहीर कराव्यात अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीत काही गैर नाही. सरकारने हा करार गुप्त असल्याचे म्हटले आहे. मी देखील संरक्षणंत्री म्हणून काम पाहिले आहे. अशा करारांमध्ये तंत्रज्ञान आणि क्षमता याबाबत गुप्तता पाळली जाते पण किंमत उघड करण्यास काही हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ही तर सुरुवात, पुढे आणखी मजा येईल : राहुल गांधी