Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे आणून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जाते - शरद पवार

हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे आणून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जाते  - शरद पवार
, शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:35 IST)
जेव्हा निवडणुका येतात तेव्हा  हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे आणून राज्यातील जनतेची साफ दिशाभूल करण्यात येते,  असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला आहे. राम मंदिराचा आरोप पुन्हा पुन्हा काढल्याने लोकांचा विश्वास बसणार नाही असेही शरद पवार यांनी म्हटले. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे,  मराठा आरक्षणाचा फायदा निवडणुकीत होईल असे दिवास्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघत असतील तर मात्र त्यांच्या भूलथापांना जनता फसणार नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार यांनी पुन्हा भाजपवर जोरदार टीका केली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप राम मंदिर करत नाही तोपर्यंत सत्तेत सहभागी होऊ नका जयंत पाटील