Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'शरद पवार यांच्याकडे कोणतही खातं नाही, मग त्यांच्याकडे बैठक का?' - गोपीचंद पडळकर

'शरद पवार यांच्याकडे कोणतही खातं नाही, मग त्यांच्याकडे बैठक का?' - गोपीचंद पडळकर
, मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (09:59 IST)
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम असून मुंबईतील आझाद मैदान येथील आंदोलनात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कोणतही खातं नसताना ते सरकारच्या बैठका का घेतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पडळकर म्हणाले, "परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याचं आम्हाला माध्यमांच्या बातम्यांमधून कळालं. पण शरद पवार यांच्याकडे सरकारमधलं कोणतही खातं नसताना त्यांच्याकडे बैठका का घेतल्या जातात?"
"गेल्या 13 दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. आमची भूमिका कायम आहे. एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये होऊ शकत नाही तर सरकारकडे काय तोडगा आहे हे त्यांनी सांगावं. सरकार अधांतरी काम करत असून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही," अशी टीकाही त्यांनी केली.
सरकारने कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानात यावं असं आवाहन पडळकर यांनी केलं.
अनिल परब आणि शरद पवार यांच्यात नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. अनिल परब म्हणाले, आता लगेच काही सांगता येणार नाही. आम्ही काही गोष्टींचा अभ्यास करत आहोत. कर्मचारी आणि प्रवासी दोघांच्या सोयीचा मार्ग काढला जाईल असं आश्वासन परब यांनी दिलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही' - नारायण राणे