Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

शरद पवार: 'एकच मुलगी, म्हणून लोक विचारायचे अग्नी कोण देणार', पवार म्हणाले

sharad pawar
, रविवार, 18 सप्टेंबर 2022 (10:13 IST)
'पुणे डॉक्टर असोसिएशन'च्या वतीने 'सिंगल डॉक्टर फॅमिली' या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधताना सार्वजनिक आयुष्यातील किस्से सांगितले.

यावेळी, केवळ एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला, असं विचारलं असता शरद पवारांनी उत्तर दिलं की, "मला फारसा काही सामना करावा लागला नाही. पण काही वेळा विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. एकदा निवडणुकीनिमित्त एका गावात गेलो होतो. यावेळी एका वयोवृद्ध व्यक्तीने विचारलं, तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या अचानक काही झालं तर अग्नी कोण देणार?"

"तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला एकच मुलगी आहे आणि मला अजिबात काळजी नाही. लोकांना अग्नीची चिंता आहे, ही गोष्ट मला काही मान्य नाही. हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं." "जिवंत असताना मुलीशी नीट वागण्याची चिंता करायची की मेल्यावर चितेला अग्नी कोण देणार याची चिंता करायची?" असंही पवार म्हणाले.
 
"कर्तृत्वाची मक्तेदारी केवळ पुरुषांकडे नाही. कर्तृत्व आहे हे इंदिरा गांधीं यांच्यासह अनेक महिलांनी सिद्ध केले," असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंदीगड विद्यापीठातील 60 विद्यार्थिनींचा व्हिडीओ व्हायरल, 8 जणांनी केला आत्महत्येचा प्रयत्न