राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. शिर्डीतील ]राष्ट्रवादीच्या मंथन मेळाव्यात आजारी असतानाही शरद पवार मेळाव्यात हजर झाले आहेत. पण यावेळी फक्त ते चार मिनिटंच बोलले. त्यांच उर्वरित भाषण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं आहे. दरम्यान शिर्डीहून पुन्हा ते रुग्णालयात दाखल होणार आहेत.
यावेळी शरद पवार म्हणाले की, उपचारांनंतर 10 ते 15 दिवसांमध्ये मी पुन्हा नियमित कामाला लागणार आहे, सध्या माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही. ज्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच भाषण वाचून दाखवलं.
यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उर्जा निर्माण केली. पवार म्हणाले की, तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे. ही संधी लवकर मिळेल असी आशा आहे, असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Edited by : Ratnadeep Ranshoor