Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिगर भाजप पक्षांसोबत याविरोधात जनमत तयार करण्याबाबतची चर्चा करणार : शरद पवार

sharad panwar
, मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:32 IST)
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार ठाणे शहरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध घडामोडींवर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.

आज राज्याचे आणि देशाचे अनेक प्रश्न आहेत. ज्यांच्या हातात देश आणि राज्याची सूत्रं आहेत, ते सर्व एका विचाराचे घटक आहेत. केंद्र सरकारने लोकांना अनेक आश्वासने दिली, मात्र पुढे त्याचे काही झाले नाही. पुढील केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणुकीत लोक मतदानातून याची प्रचिती दाखवून देतील, असे पवार म्हणाले.

गुजरात, आसाम सोडले तर अनेक राज्यात बिगर भाजप पक्षांची सत्ता आहे. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्रात देखील बिगर भाजप पक्षांची सत्ता होती. राज्यांची सत्ता जनतेने भाजपला दिली नव्हती. याचा अर्थ लोकांचं मत त्या पक्षासंबंधी काय होतंय, याची प्रचिती या माध्यमातून येते. त्यामुळे माणसे फोडणे, ईडीसारख्या यंत्रणेचा वापर करुन सत्ता काबीज करणे, असे गंभीर चित्र दिसत आहे. बिगर भाजप पक्षांसोबत याविरोधात जनमत तयार करण्याबाबतची चर्चा करणार आहोत, असे पवार यावेळी सांगितले.

दुसऱ्या बाजूला राजकीय पुढाऱ्यांना या ना त्या मार्गाने त्रास देण्याचे काम सुरु आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर ईडी, आयटी, सीबीआयच्या ११० वेळा धाडी टाकण्यात आल्या. धाडी टाकण्याचा हा उच्चांक या देशात आधी कधी घडला नव्हता. नवाब मलिक आणि खासदार संजय राऊत यांच्याबाबतही हे घडले. इतर राज्यात देखील अशाचप्रकारे या यंत्रणांचा वापर केला जात आहे. अलीकडे हे नवीन चित्र देशात दिसत आहे, ही सर्वांसाठी चिंताजनक बाब आहे, असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इतकी जवळीक न्याय संस्थेसंदर्भात मी कधी ऐकली नव्हती-शरद पवार