Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

sharad panwar
, शुक्रवार, 3 मे 2024 (19:33 IST)
जळगावच्या यावल तालुक्यात किनगाव जवळ शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात शरद पवार चोपडा येथून सभा संपवून भुसावळकडे जात असताना झाला. अचानक स्पीड ब्रेकर आल्याने पुढील गाडीने ब्रेक मारले या मुळे ताफ्यामागच्या गाड्या एकमेकांना धडकल्या अपघातात चार वाहनांना नुकसान झालं आहे.एक कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.  

बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर वाघोडे गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेनंतर नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उदभवला आहे.  शुक्रवारीच आज रायगडच्या महड येथे सुषमा अंधारे यांना घ्यायला जाणारे हेलीकॉप्टर कोसळले. या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. सुषमा अंधारे हेलीकॉप्टरमध्ये चढण्याआधी हेलीकॉप्टर कोसळले. सुदैवाने त्या बचावल्या.सुषमा अंधारे या बारामतीच्या दिशेने जात होत्या. 
 
 Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाशिममध्ये दोन कारची धडक, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू