Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अपहरण करुन बळजबरीने केले लग्न, पोटावर सिगारेटचे चटके देऊन तिचे विवस्त्र अवस्थेत फोटो काढले

अपहरण करुन बळजबरीने केले लग्न, पोटावर सिगारेटचे चटके देऊन तिचे विवस्त्र अवस्थेत फोटो काढले
, बुधवार, 8 डिसेंबर 2021 (12:10 IST)
संगमनेर- चार जणांनी येथे राहणाऱ्या एका युवतीचे अपहरण केले. चारपैकी एकाने युवतीवर अत्याचार करत तिच्याशी बळजबरीने लग्न केले. लग्नानंतर पुन्हा अत्याचार केले. त्याने युवतीच्या पोटावर सिगारेटचे चटके दिले आणि तिचे विवस्त्र अवस्थेत फोटो काढून तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित युवतीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण अरुण लगड (२६), संकेत भगवान राणे (२७), दर्शन शिवाजी हिरे (२५), राहुल कैलास वाघमारे (२८, सर्व रा. सिन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 
 
30 नोव्हेंबरला सकाळी नऊच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील संगमनेरमध्ये राहणारी युवती नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेरमधील एका महाविद्यालयासमोरून जात असताना चौघे आरोपी कारमधून आले. त्यांनी तिला बळजबरीने कारमध्ये बसविले आणि सिन्नर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. 
 
प्रवीण लगड याने तिच्यासोबत मारहाण करत तिला उग्र वासाचे थंड शीतपेय बळजबरीने पाजलं आणि तिच्यावर अत्याचार केले. त्याने तिच्या पोटावर सिगारेटचे चटके दिले आणि विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले. नंतर 1 डिसेंबरला चौघांनी तिला पंचवटी येथे नेले. कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन प्रवीण लगड याने तिच्याशी बळजबरीने लग्न केले. तिच्यावर बळजबरीने लग्नाची नोंदणी करण्याच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या गेल्या.
 
नंतर पुन्हा तिला सिन्नर येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार करत पुन्हा तिचे विवस्त्रावस्थेत फोटो काढले. नंतर 2 डिसेंबरला युवतीला बळजबरीने सिन्नर पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि धमकी देत मी माझ्या मर्जीने निघून आलेली असून, मला कोणीही पळवून आणलेले नाही असे पोलिसांना सांगण्यास बजावले. पोलिसांनी देखील तसे स्टेंटमेंट घेत त्यावर तिची सही घेतली. नंतर युवती तिच्या नातेवाइकांसोबत संगमनेर येथे निघून आली, असे फिर्यादीत म्हटले आहे. नंतर याप्रकरणी पीडित युवतीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Omicron: लहान मुलांमधील या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांची त्वरित तपासणी करा