Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साईबाबा मंदिरात 3 कोटी रूपयांचा चढावा

साईबाबा मंदिरात 3 कोटी रूपयांचा चढावा
सरकारने नोटबंदीचे पाऊल उचलल्यावर शिरडीच्या साईबाबा मंदिराचे प्रबंधन करणारे श्री साईबाबा शिरडी संस्थानाला 1000 आणि 500 रूपयांच्या जुन्या नोटा मिळून 3 कोटी रुपये प्राप्त झाले. नोटबंदीनंतर मंदिरांना 8 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या काळात दान आलेल्या रकमांची एक रिपोर्ट द्यायला सांगितले गेले.
साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हवारे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मदिरांना सांगितले आहे की दानपात्रात दानमध्ये आलेले चलनातून बाहेर नोटांची माहिती पुरवावी.
 
ट्रस्टला 1000 रूपयांच्या नोटात 1.27 कोटी रुपये आणि 1. 57 कोटी रुपये 500 रूपयांच्या नोटांद्वारे प्राप्त झाले आहे. हवारे यांनी सांगितले की मंदिरात 47 दानपात्र आहे जे श्रद्धालु आणि ट्रस्टच्या उपस्थितीत दररोज उघडले जातात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पैसा बचतीत भारतीय तरुण मागे