Publish Date: Mon, 12 Dec 2016 (17:06 IST)
Updated Date: Mon, 12 Dec 2016 (17:08 IST)
प्रत्येक भक्ताला शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी वेळेचं बंधन असणार आहे. शिर्डीमध्ये टाईम दर्शन सुविधा सुरू होणारे. नोंदणी केल्यानंतरच आता भक्तांना साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे. नोंदणी करण्यासाठी संस्थानाच्या परिसरात १० काउंटर्स उघडण्यात आले आहेत. नोंदणी केल्यानंतर संस्थानातर्फे एक कार्ड देण्यात येईल ज्यावर तुम्ही कधी दर्शन करू शकता याची वेळ दिलेली असेल.दर्शनासाठीही आता फक्त १५ मिनिटांचाच अवधी असेल. त्यामुळे आता वेळेत दर्शन हवे असल्यास भक्तांना वेळ पाळावि लागणार आहे.