Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी

shirdi saibaba mandir
, सोमवार, 25 डिसेंबर 2017 (09:57 IST)

नाताळच्या सुट्टीच्यानिमित्ताने शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत. तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे धार्मिक स्थळी मोठी गर्दी झालीय. साईबाबांच्या दर्शनाबरोबरीनेच शनी शिंगणापूर आणि औरंगाबाद येथे जाऊन पर्यटन आणि धार्मिक दर्शन करण्याकडे भाविकांचा कल आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डी हाऊसफुल्ल झालीय. साईमंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्यात. 

या गर्दीच्या काळात साईबाबा संस्थानने व्ही.आय.पीसाठी देण्यात येणारे पासेस बंद ठेवलेत. यावर्षी प्रथमच साईबाब संस्थानने आज रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डीत सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हाऊसफुल्ल झालेत.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ही तर फक्त अफवा, आरबीआयचे स्पष्टीकरण