Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घरात घरात शिवसैनिक बॅरिकेड तोडून घुसले

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घरात घरात शिवसैनिक बॅरिकेड तोडून घुसले
, शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:50 IST)
अमरावीतच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा काल मुंबईत दाखल झाले आणि आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमानचालिसा म्हणणार असल्याचं जाहीर केलं आहे. काल राणा दाम्पत्य मुंबईत आल्यापासून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. आता शिवसैनिक राणांच्या घरात घुसले आहेत. ोजोपर्
 
आज नवनीत आणि रवी राणा मातोश्रीवर नऊ वाजता पोहोचणार असल्याचं सांगितलं जात आहे. खार येथील राणा यांच्या निवासस्थानी तसंच, मातोश्रीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
 
कालपासून शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीसमोर आले आहेत. तिथे ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शिवसैनिकांच्या मते राणा दाम्पत्याने अमरावतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा म्हणावी. मातोश्री आमचं मंदिर आहे. राणा दाम्पत्य मुंबईपर्यंत येतील असं वाटलं नव्हतं पण आलेच आहेत तर त्यांचा चांगला पाहुणचार करू अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.
 
राणा दाम्पत्य काल मुंबईत आल्यावर ते खार येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथे त्यांना पोलिसांनी नोटीस दिली. कायदा व सुव्यवस्थेचा कोणाताही प्रश्न निर्माण होणार नाही असं आश्वासन घेतलं तरी राणा दाम्पत्य हनुमानचालिसा म्हणायच्या निर्णयावर ठाम होते.
 
कालपासूनच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील निवासस्थानी आणि मातोश्रीसमोर पहारा दिला होता. संध्याकाळ झाली तरी त्यांनी मातोश्रीचं आवार सोडलं नाही. मु मुख्यमंत्री घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी शिवसैनिकांना परत जाण्याची विनंती केली मात्र शिवसैनिकांनी मातोश्री निवासस्थानाचा परिसर सोडणार नसल्याचा निर्धार बोलून दाखवला.
 
नवनीत आणि रवी राणा काय म्हणाले?
आमदार रवी राणा म्हणाले, "उद्धवसाहेब हिंदुत्व विसरले आहेत आणि ते दुसऱ्याच दिशेनं जाऊन महाराष्ट्राचं वाटोळं करतायेत. महाराष्ट्राचं हे विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालिसा वाचण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि उद्या 9 वाजता आम्ही तिथं जाणार आहोत."
 
मुंबई पोलिसांनी आम्हाला कलम 149 नुसार नोटीस दिलीय, अशी माहिती राणा दाम्पत्यानं दिली.
यावेळी रवी राणा म्हणाले, "आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाहीय. आमचा एकच उद्देश आहे, महाराष्ट्रातील संकटाच्या मुक्तीसाठी मोतीश्रीची वारी करणार आहोत. बजरंगबली, हनुमानाचं नाव घेताना विरोध होत असेल तर त्याला विरोध करावा लागेल."
 
"कायदा सुव्यवस्थेचं पालन करून मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू. कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाहीत. माझं आमच्या लोकांना आवाहन आहे की, मुंबईत येऊ नका. वातावरण बिघडवायचं नाहीय," असंही राणा म्हणाले.
"मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असं शिवसैनिक म्हणाले होते. पण शिवसैनिकांना मी मुंबईत आलो हे कळलंच नाही. आणि पाय नाही इथं जिवंत उभा आहे," असंही रवी राणा म्हणाले.
 
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, "बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही, समाजासाठी लढाई केली."
 
"मुंबईत जन्म, विदर्भाची सून, शिवसैनिक माझं काहीही बिघडवू शकत नाही," असंही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.
 
भाजपला बंटी आणि बबलीची गरज - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी रामा दाम्पत्याला बंटी बबलीची उपमा दिली.
नागपुरात बोलताना ते म्हणाले, "राणा दाम्पत्याला जर स्टंटच करायचे असतील तर शिवसेनेलाही स्टंटचा अनूभव आहे. त्यांना मुंबईचे पाणी माहित नाही अजून. हनुमान चालीस वाचणे, रामनवमी हे श्रद्धेचे विषय आहेत. हे नौटंकीचे किंवा स्टंटचे विषय नाही. भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंट करून ठेवला आहे. त्यातली ही सर्व पात्रं आहेत.

"राणा दाम्पत्याला लोक यांना गांभीर्यानं घेत नाहीत. महाराष्ट्रात आम्ही सर्व सण साजरे करतो, रामनवमी, हनुमान जयंती आणि गुढीपाडवा साजरा करतो. भाजपाला आता राणा दांपत्यासारख्या बंटी आणि बबलीची आपल्या मार्केटिंगसाठी आवश्यक पडते अशी परिस्थिती आहे. मुंबईचे पोलीस आणि शिवसैनिक सक्षम आहे. भारतीय जनता पक्षाला आता मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार्सची गरज पडली आहे."
 
दरम्यान पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याशी चर्चा केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याबाबत चर्चा झाली असल्याचं उपायुक्तांनी सांगितलं.  
 
राणा यांची मातोश्रीवर आंदोलन करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही.
 
2020 च्या ऐन दिवाळीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा पवित्रा घेतला. शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईत 'मातोश्री' वर धडक देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
 
पण, पोलिसांनी त्यांना अमरावतीतच ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे आता काय होतंय यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै होणार