Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्या घरी बसाल सूचक इशारा - शिवसेना

उद्या घरी बसाल सूचक इशारा - शिवसेना
, सोमवार, 30 जानेवारी 2017 (13:41 IST)
शिवसेना आणि भाजपामधील संबंध चांगलेच चिघळले आहेत असे चित्र राज्यात तयार झाले आहे. तर  मुंबईतील सभांमध्ये औकात दाखवण्यापासून पाणी पाजण्यापर्यंतची भाषा वापरण्यात आली आहे. तर रोज एक आरोप आणि रोज एक नेता एकमेकांना नावे ठेवत आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी टीका करत 25 वर्ष भाजपासोबत सडलो, यापुढे कुठेही युती नाही, जाहीर केल. मात्र आय्वर  भाजपा मेळाव्यात शिवसेनेला जागा दाखवून देण्याचे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.   शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा सामनातून चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना जळता लोळ आहे. आमच्या नावाने शंख कराल तर आज फक्त घसा बसला. उद्या घरी बसावं लागेल असा इशारा सुद्धा दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकचे बोटॅनिकल गार्डन पाहून रतन टाटा प्रभावित