शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिवडी न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. तसेत, येत्या 18 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.मेधा सोमय्या यांचे पती आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर संजय राऊत यांच्याविरोधात जारी केलेले अटक वॉरंट शेअर केले आहे. तसेच, “मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारीनी संजय राऊत यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले”,
शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गेल्या महिन्यात राऊत यांच्याविरुद्ध समन्स जारी करून त्यांना 4 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, सोमवारी न्यायालयात राऊत किंवा त्यांचे वकील हजर नव्हते, असे मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी सांगितले.
गुप्ता म्हणाले की, राऊत हजर न राहिल्यामुळे आम्ही त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज केला, त्याला न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती देत 18 जुलै रोजी सुनावणी ठेवली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारी प्रकरणी कोर्टाकडून संजय राऊत यांना वॉरंट जारी करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर मीरा-भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळ्यात सामील झाल्याचा आरोप केला होता. संजय राऊत हे बिनबुडाचे आरोप करण्याची तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात केली होती. राऊतांना कोर्टाने समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश देऊन देखील राऊत कोर्टात हजर झाले नाही. या कारणास्तव त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने संजय राऊतांना तत्काळ जामीन मंजूर केला आहे.