Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

सर्वात धनाढ्य प्रादेशिक पक्ष 'शिवसेना'

mahrashtra news
शिवसेना देशातील सर्वात धनाढ्य प्रादेशिक पक्ष ठरला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) आकडेवारीनुसार 2016-17 या आर्थिक वर्षात शिवसेनेला तब्बल 25.65 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. देशभरातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारावर एडीआरनं हा अहवाल तयार केला आहे. 
 
शिवसेनेनंतर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला 3 हजार 865 देणगीदारांकडून 24.75 कोटी रुपयांची देणग्या मिळाल्या आहेत. सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्षांच्या यादीत पंजाबमधील शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पक्षाला 2016-17 या आर्थिक वर्षात 15.45 कोटी रुपयांची रक्कम देणगी स्वरुपात मिळाली आहे. शिवसेनासर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरला असला तरी, 2015-16 च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या देणग्यांच्या रकमेत 70 टक्क्यांची घट झाली आहे. 2015-16 मध्ये शिवसेनेला 61.19 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, शाळेतल्या वायरमनला अटक