Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरावतीत राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी; “छत्तीस दिवस पाखडले…”

अमरावतीत राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी; “छत्तीस दिवस पाखडले…”
, शनिवार, 28 मे 2022 (21:49 IST)
पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि शिवसेना आमने सामने आली आहे. छत्तीस दिवसानंतर खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा  हे अमरावतीला जाणार आहेत. त्यांच्या स्वागताची युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली होती. तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावून राणा दाम्पत्यावर टीकेची झोड उठवली आहे.
 
छत्तीस दिवस पाखडले काहीच नाही सापडले. शेवटी आले येथेचं, अशाप्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहेत. राणा दाम्पत्याविरोधात हे पोस्टर अमरावतीत लावण्यात आले आहेत. शिवसेनेचे पराग गुढगे यांनी हे पोस्टर लावलेले आहेत. छत्तीस दिवस राणा दाम्पत्य अमरावतीत नसल्यामुळं अमरावती जिल्हा विकासपासून दूर राहिला. मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जिल्ह्यातून गायब होते. अमरावती जिल्ह्यातील नागरिक हे महागाई, बेजोजगारीने त्रस्त झाले आहेत. आता महागाई, बेरोजगारीचा प्रश्न त्यांनी सोडवावा, या आशयाचे पोस्टर शिवसेनेने राणा दाम्पत्याविरोधात लावले आहे.
 
हनुमान चालिसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्य हे आज 36 दिवसांनंतर अमरावती जिल्हात येत आहे. राणा दाम्पत्याचे स्वागत करण्यासाठी युवा स्वाभिमान समर्थकांनी तयारी केली होती. मात्र ३६ दिवस अमरावती जिल्ह्याकडे दुर्लक्ष झालंय. विकास खुंटला असा आरोप अमरावतीच्या शिवसेना नेत्यांनी केला. तर बेरोजगार, महागाई विरोधात राणा दाम्पत्य का बोलत नाही असा सवाल राणा दाम्पत्याला शिवसेनेने केलाय. अमरावतीत राणांच्या विरोधात शिवसेनेने बॅनरबाजी करत त्यांचा विरोध दर्शविला. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शहीद जवान प्रशांत जाधव यांचे अंत्यसंस्कार होणार या ठिकाणी…