Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यूपी निवडणूकीत शिवसेना 100 जागा लढणार, संजय राऊत यांची घोषणा

यूपी निवडणूकीत शिवसेना 100 जागा लढणार, संजय राऊत यांची घोषणा
, सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (16:46 IST)
येत्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूका होणार आहे.तेथील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 403 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.तशी घोषणानाही शिवसेनेने केली मात्र, 24 तासांत पुन्हा खाली येत 100 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
 
2017 च्या निवडणूकीत शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये 57 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 56 जागांवर पराभव झालाच त्याचबरोबर डिपॉझिटही जप्त झाले. एका जागेवर डिपॉझिट वाचवण्याची नामुष्की शिवसेनेवर आली होती. त्यामुळे यूपीमध्ये शिवसेनेला जनाधार नसल्याची वस्तुस्थिती आहे. उत्तर प्रदेशच्या 2017 च्या निवडणूकीत 8 कोटी 67 लाख 28 हजार 324 लोकांनी मतदान केले.यात 1 टक्के मतदानही शिवसेनेला झालं नाही. शिवसेनेच्या 57 उमेदवारांना एकूण 88 हजार 595 मतं मिळाली होती.दरम्यान, 43 मतदार संघ असे होते की, तेथे शिवसेनेच्या उमेदवाराला एक हजारापेक्षा कमी मतदान झाले आहे.तर काही अशा जागा होत्या की तेथे सेनेच्या उमेवाराला 200 मतही मिळाली नाहीत.नोटा पेक्षा कमी मतदान सेनेच्या उमेदवाराला झाले.गोंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या महेश तिवारी यांनी मात्र, डिपॉझिट वाचलं होत.त्यांना 35 हजार 606 मत मिळाली होती.तर या मतदार संघात शिवसेना चौथ्या स्थानावर होती.याशिवाय बदायू विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला 14 हजार 576 मतं मिळाली होती. परंतु या मतदारसंघात डिपॉझिट वाचवता आलं नाही.
 
 उत्तर प्रदेशात शिवसेनेचा मविआ प्रयोग
संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश निवडणूकीत शिवसेना 100 जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले असून महाराष्ट्राप्रमाणेच महाविकास आघाडीचा प्रयोग यूपीत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.याबाबत बोलताना राऊत म्हणाले, यूपीतील काही शेतकरी संघटनांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.युती झाली तर ठीक नाही तर स्वतंत्रपणे लढू असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता नोंदणीकृत मोबाईल नंबरशिवायही आधार कार्ड डाउनलोड करू शकता, जाणून घ्या कसे