शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर शिवसेनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.एकनाथ गटात शामिल झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.आता आढळराव पाटील नंतर कोणाचा नंबर लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार यांनी देखील एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा संदेशात त्यांनी 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब'असं म्हटलं या मुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात कारवाई करत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या हकालपट्टीनंतर मोठा शिरूर मतदारसंघाचं काय होणार अश्या चर्चा रंगत आहे.