Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘वाघनखे ’मिळणार फक्त 3 वर्षांसाठी

sudhir munguttiwar
, शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (20:36 IST)
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’आणण्याची तयारी सुरू आहे. वास्तविक2024 हा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापनदिन आहे. या वर्षाच्या अखेरीस ‘वाघनखे’ भारतात आणली जातील, अशी अपेक्षा आहे. ही वाघनखे राज्य सरकारला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाकडून तीन वर्षांसाठी दिली जाणार आहेत, असे सांस्कृतिक कार्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे.
 
ही ‘वाघनखं’ सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या चार वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित केली जाणार आहेत.
 
‘वाघनखं’ परत आणण्यासाठी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती वाघनखाचे प्रदर्शन आणि राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांच्या योजनांना अंतिम रूप देईल. ११ सदस्यीय समितीचे अध्यक्ष विकास खारगे आहेत आणि त्यामध्ये पोलिस महासंचालक, शहर आणि नागपूरच्या पोलिस आयुक्तांसह नोकरशहा आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखं नोव्हेंबरमध्ये आणणार असल्याचे सांगितले आहे. मुनगंटीवार इंग्लंडला जातील आणि व्ही अँड ए म्युझियमसह सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gold Rate Today 30 September 2023 सोने इतक्या रुपयांनी स्वस्त