‘जलयुक्त लातूर’ या प्रकल्पाचे काम पाहून प्रभावित झालेल्या माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी या कामास लातूर येथे भेट दिली आहे . हे काम असेच निरंतर चालू रहावे अशी शुभेच्छा देत एक लाखाचा धनादेश जलयुक्त समितीकडे सुपुर्त केला. लातूर मध्ये देशातील अभूतपूर्व दुष्काळ पडला होता तर लातूरला मिरज येथून देशात प्रथमच रेल्वेच्या मादीने पाणी पोहचवले होते.पुन्हा अशी वेळ येवू नये या करिता लातूर मध्ये मोठय प्रमाणत जलयुक्त लातूर निर्माण केले आहे.
लातूरच्या पाणी टंचाईचा वृत्तांत वर्तमानपत्रातून वाचत होतो. या प्रकल्पास भेट द्यावी, कार्यकर्त्यांना कौतुकाची दाद द्यावी अशी अनेक दिवसांपासून इच्छा होती. या प्रक्ल्पास भेट देण्याची वेळ आली. नदीपात्रात साठलेले मुबलक पाणी पाहून मन भरुन आले अशा भावना चाकूरकर यांनी व्यक्त केल्या. . चाकूरांनी जलयुक्त समितीच्या सदस्यांसोबत साई, आरजखेडा, नागझरी आदी भागातील जलयुक्तच्या कामांची पाहणी केली.