Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा शिवसेना नाराज, मंत्रिमंडळ बैठकीतून केला वॉकआउट

पुन्हा शिवसेना नाराज, मंत्रिमंडळ बैठकीतून केला वॉकआउट
, मंगळवार, 3 जानेवारी 2017 (17:21 IST)
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्री आणि सह पालकमंत्री पदावरुन पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत वाद होतांना दिसत आहे. शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्रीपदावरुन हटवल्याने, शिवसेना नाराज आहे. शिवसेनेशी चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्या नाराजीतूनच शिवसेनेने  मंत्रिमंडळ बैठकीतून काढता पाय घेतला. संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलं आहे. मात्र त्यांना यवतमाळच्या पालकमंत्रीपदावरुन का काढलं? असा सवाल करत, त्यांना पुन्हा यवतमाळचं पालकमंत्रीपद द्यावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा अबू आझमी यांनी केले वादग्रस्त विधान