शिवसेनेने राज्यभरात प्रचारासाठी चार हुकमी एक्क्यांची निवड केली आहे. शिवसेनेचा आवाज आणि विकासामांची यादी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं हे चार जण करणार आहेत. राज्याचे पर्यायवरण मंत्री रामदास कदम, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते अमोल कोल्हे आणि शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे चार जण राज्यभर शिवसेनेचे मेळावे घेणार आहेत. भाषण करणाऱ्यांमधील मास्टर समजले जाणारे नेते महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने प्रचारासाठी उतरवले आहेत.