Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेना-भाजपला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही: गडकरी

सेना-भाजपला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही: गडकरी
मुंबईत शिवसेना आणि भाजप  दोन्ही पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत मिळाले नाही त्यातच आता मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय दिसत नाही, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या या वक्‍तव्यामुळे सत्तेसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
शिवसेनेसोबतची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. निवडणुकीच्या काळात मतभेद झाले असले तरी ते तितके टोकाचे नाहीत. जे झाले ते विसरुन मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचाराने निर्णय घ्यावा असे मतही गडकरींनी यावेळी व्यक्‍त केले.

शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर महापौर कुणाचा होणार यावरही सांगताना, प्रत्येकालाच आपला महापौर असावा असे वाटते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मॅच्युअर आहेत, ते योग्य निर्णय घेतील. कारण शिवसेना आणि भाजपची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतभेद नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. दुसरीकडे शिवसेना हा मित्रपक्ष असला तरी सामनातील भूमिका योग्य नसल्याचेही खंतही यावेळी गडकरी यांनी व्यक्‍त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वस्त स्मार्टफोन देणार्‍या फ्रिडम 251 च्या संचालकाला अटक