Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनचे गट नेते म्हणून निवड पूर्ण

शिवसेनचे गट नेते म्हणून निवड पूर्ण
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून यशवंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची निवड जाहीर केली. यशवंत जाधव तिसऱ्यांदा माझगावमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी यंदा वॉर्ड क्रमांक 209 मधून विजयी झाले आहेत.

यशवंत जाधव हे गेल्या 38 वर्षापासून शिवसेनेत आहेत. जाधव हे 1997 साली पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यांनी मुंबई महापालिकेत 7वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद, तसंच स्थापत्य समिती शहर, प्रभाग समिती अध्यक्षपद, बाजार आणि उद्यान समिती अध्यक्षपद भूषविले आहे.एका बाजूला शिवसेनेन गट निर्माण करायला आणि इतर गोष्टीसाठी सुरुवात केली आहे. तर भाजपा अजूनही आपली रणनीती आखत आहे.कदाचित महापूर शिवसेनेचा होणार हे नक्की झाले आसवे असे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेचे आता गट स्थापन