राज्य शासनाकडून माता व बाळ मृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करून विविध उपाय करण्याचा दावा केला जातो. अहवालानुसार, महाराष्ट्रात दर दिवसाला सुमारे 34 बाळांचा आईच्या गर्भातच मृत्यू होत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलाच्या अहवालातून समोर आली आहे.
यानुसार, महाराष्ट्रात 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2023, दरम्यान 22 हजार 98 कमी वजनाच्या बाळांचे मृत्यू झाले. एका दिवसात सरासरी काढली असता 34 बाळांचा मृत्यू होत असून 3 मातांचा मृत्यू होत आहे. अर्भकांची विकलांगता, रक्ताची कमी, अपघातामुळे बाळांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असते. प्रत्येक मातेने गर्भधारणेपूर्व डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांच्या दिलेल्या सल्लाचे पालन केल्याने बाळ आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकतात. अनेकदा प्रसूती घरीच केल्याने देखील बाळ आणि मातांच्या जीवाला धोका होऊ शकतो. मातांची प्रसूती रुग्णालयात होणे आवश्यक आहे.