Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यभरात 4 हजार अनधिकृत शाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली

school
, सोमवार, 14 एप्रिल 2025 (17:00 IST)
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी राज्यभरात सुमारे 4 हजार अनधिकृत शाळा सुरु असल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अनेकदा अपील करून देखील सरकार या संघटनेविरुद्ध कारवाई करण्यास अपयशी ठरले आहे. असा त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. तसेच त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला. 
 ALSO READ: नागपुरात देशातील पहिली स्किन बँक उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
ठाणे जिल्ह्यातील सुमारे 81 अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याच्या नोटीस ठाणे महानगरपालिकेने शाळांना दिल्या होत्या. त्यासाठी संजयराव तायडे पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेचे कौतुक केले होते. राज्याचे सरकारी अधिकारी निष्क्रियपणे काम करत असल्याचे ते म्हणाले.
आम्ही लेखी पत्रव्यव्हारद्वारे सरकारला अनेक वेळा कळवले असून त्यांच्या कडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊले घेतले नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी आणि विनंती त्यांनी केली आहे. 
या साठी मेस्टा येत्या 21 एप्रिल रोजी राज्यव्यापी बैठक आयोजित करणार आहे. या बैठकीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वसतिगृहातील मुलांवरील लैंगिक शोषण प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी केली राज्य सरकार कडे ही मागणी