Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक! डहाणूचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचं निधन

धक्कादायक! डहाणूचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचं निधन
, सोमवार, 29 मार्च 2021 (16:25 IST)
डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे (४१) यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. डहाणू नगर परिषद येथे दुसऱ्यांदा मुख्याधिकारी पदाचा पदभार ते सांभाळत होते. करोना काळात डहाणू नगर परिषदेच्या क्षेत्रात त्यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली होती. पिंपळे हे चांगल्या कारभाराबरोबरच प्रशासनावर वचक निर्माण करणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
 
२६ मार्च रोजी सकाळी पिंपळे त्यांच्या डहाणू मल्याण येथील घरात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना डहाणू व्हेस्टकोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने तसेच डायलेसिस करण्यासाठी सोमवारी त्यांना हिंदूजा रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाकड परिसरातील सुनिल ठाकुर टोळीवर मोक्का