Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक! घरभाड्याचा तगादा लावल्याने घर मालक वृद्धेची हत्या

धक्कादायक! घरभाड्याचा तगादा लावल्याने घर मालक वृद्धेची हत्या
, शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (10:19 IST)
नाशिकमधील  सातपूरमधील चुंचाळे परिसरातील अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. घरभाड्याचा तगादा लावल्याने भाडेकऱ्याने थेट घरमालक असलेल्या वृद्धेची हत्या केली आहे. अवघ्या एक तासातच पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आहे. यासंबंधीची माहिती पोलिस उपायुक्त विजय खरात आणि सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
 
दिलेल्या माहितीनुसार, दत्त नगर परिसरात खुनाची घटना घडली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव जिजाबाई पांडुरंग तुपे (वय ६८, माऊली चौक, दत्तनगर, चुंचाळे) असे आहे. दोन दिवसांपासून ही महिला घरी दिसत नाही म्हणून शेजारच्या कुटुंबांनी या महिलेचा शोध घेतला. या महिलेच्या घरात एका गोणीमध्ये त्यांचा मृतदेह असल्याची बाब त्यांच्या निदर्शास आली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वृद्ध महिलेचा मृतदेह गोणीत असल्याचे दिसून आले.
 
पोलिसांनी परिसरात चौकशी केली. या वृद्ध महिलेचा भाडेकरु हा १३ एप्रिलपासून गावी गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्याविषयी शंका आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, किरण गायकवाड, मुकेश गांगुर्डे, हेमंत आहेर यांचे पथक तयार करण्यात आले. भाडेकरुच्या शोधासाठी मान ता. अकोले जि. अहमदगर येथे हे पथक गेले. तेथे त्यांनी निलेश हनुमंत शिंदे (वय २१) व त्याची पत्नी दीपाली नीलेश शिंदे (वय १९) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या दाम्पत्याने हत्येची कबुली दिली आहे.
 
या दाम्पत्याने मंगेश बाळू कदम (वय १९, रा. विल्होळी) व विष्णू अंकुश कापसे (वय १९, विल्होळी) यांच्या मदतीने जिजाबाई यांना एकटे गाठले. जिजाबाई यांच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले. तसेच, दोरीने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाने मृत झालेल्या महापालिका कर्मचा-यांच्या नातेवाईकांना 25 लाखांचे अर्थसहाय