Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पूत्र सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पूत्र सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक
, गुरूवार, 27 मे 2021 (21:01 IST)
पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पूत्र सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक करण्यात आली आहे. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
पिंपरी - चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवार यांने उलट सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण वहत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. 
 
तानाजी पवार याच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली. 
 
पिंपरी - चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात ११ मे रोजी दुपारी घुसून सिद्धार्थ बनसोडे तेथील दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोखंडी टॉमीने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून सिद्धार्थ आणि त्याच्या दहा साथिदारांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. दरम्यान आमदार बनसोडे यांच्या पीएलाही देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !