साप किंवा सापाचं नाव जरी समोर आले तरीही अंगाचा थरकाप उडतो. पण एका चिमुकल्याला सापाने चावल्यावर तो सापाला घेऊन थेट रुग्णालयात जाऊन पोहोचला. आणि म्हणाला, डॉक्टर काका हा साप मला चावला.
सदर घटना अजिंठा येथे एका ग्रामीण रुग्णालयात घडली. शेख अमान शेख रशीद असे या मुलाचे नाव आहे.
झाले असे की अजिंठा तालुका सिल्लोड येथे निजामकालीन बारावची अवस्था बिकट झाली असून त्यात परिसरातील कचरा जमा होतो. त्यात कचरा टाकत असलेल्या एका 14 वर्षाच्या मुलाला सापाने दंश केले. त्याला काहीतरी चावल्याचे जाणवले त्याने सापाला पहिले. त्याच्या सोबत त्याचे काका देखील होते. दोघांनी सापाला शोधणे सुरु केले साप शोधल्यावर ते थेट सिल्लोडच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन पोहोचले आणि जाऊन डॉक्टरांना म्हटले की डॉक्टर काका मला हा साप चावला आहे. आता उपचार करा.
जिवंत सापाला हातात घेतलेलं पाहून डॉक्टर ही घाबरले आणि त्यांनी सापाला बाटलीत बंद करण्यास सांगितले. सापाला बाटलीत बंद केले नंतर मुलावर प्राथमिक उपचार करण्यात आले. आणि त्याला छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात रेफर केले. तिथे डॉक्टरांना साप बिनविषारी असल्याचे समजले.
तो साप पानदिवट असून पाण्यात राहतो. असे सर्पमित्राने सांगितले. मुलाने अतिशय धाडसाने सापाला पकडले आणि साप पळू नये म्हणून चक्क आपल्या उशाशी घेऊन झोपला. मुलाच्या धाडसाचे कौतुक होत आहे.