Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिन्नर : मनसेचे नेते अमित ठाकरेंची गाडी टोल नाक्यावर अडवली, कार्यकर्त्यांनी टोलनाक्यात तोडफोड केली

amit thackeray
, रविवार, 23 जुलै 2023 (15:47 IST)
मनसेचे नेते अमित ठाकरें यांना काल रात्री अहमदनगर येथून सिन्नर कडे येत असताना सिन्नर समृद्धी महामार्गावर टोलनाक्यावर अमित ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा अडवून त्यांना थांबवून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचा आरोप मनसे कडून करण्यात आला आहे .त्यांच्या सोबत अरेरावी आणि गैरवर्तन कारण्याचा आरोप मनसे च्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या वाहनावर फास्टॅगअसून देखील त्यांना अडवण्यात आले.  त्यांच्याशी असभ्य वर्तन करण्यात आलं. ही गोष्ट मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच, त्यांनी हा टोलनाका फोडला.
 
ही गोष्ट समजल्यावर माध्यमांनी अमित ठाकरेंशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, "ते बोलले त्यांच्या काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत.कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला फोन लावला की गाडीला अशी अडचण येत आहे, मॅनेजर पण उद्धटपणे बोलला. ते वॉकी-टॉकीवर एकमेकांशी बोलत होते आणि वॉकीटॉकीतून आवाज बाहेर येत होता. त्यानंतर त्यांनी गाडी 10-15 मिनिट थांबवून ठेवली आणि नंतर  सोडली.टोल कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून टोलनाका फोडण्यात आले आहे .या घटनेचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे नेते अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी काल अहमदनगर वरून सिन्नरकडे समृद्धी महामार्गावरून येत असताना त्यांचा वाहनाचा ताफा सिन्नर टोलनाक्यावर अडवला.
त्यांना अर्धा तास थांबवून संबंधित टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.कार्यकर्त्यांना संताप आल्यामुळे त्यांनी टोलनाका फोडला. अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असताना गोंदे टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली होती. याच गोष्टीचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी हा टोल नाका फोडला.
 
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुर : ऑनलाईन गेम मध्ये व्यापाऱ्याला 58 कोटींचा गंडा