Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू
नाशिकमध्ये ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला आहे.  इंदिरानगर परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे. यामध्ये नाशिक-पाथर्डी रोडवरील बिर्ला सिमेंट गोडाऊनला राजस्थानहून नाशिकला सिमेंटच्या गोण्या घेऊन हा ट्रक आला होता. 
 
राजस्थानहून आलेल्या श्रीराम चौधरी नामक ट्रक ड्रायव्हरनेगोड़ाऊन समोर ट्रक उभा करुन तो ड्रायव्हर सीट वरच झोपी गेला होता. ट्रकमध्ये झोपण्यास जागा नसल्यानं क्लिनर महेंदर भाट हा ट्रक खाली मध्यभागी जाऊन झोपला होता. दरम्यान संध्याकाळी ड्रायव्हरला जाग येताच त्याने ट्रक चालु करून मागे घेतला आणि ड्रायव्हरनं ट्रक मागे घेताच महेंदर हा पुढच्या चाकाखाली दाबला गेला आणि यात त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. यात जागीच त्याचा मृत्यू झाला. इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ड्राइवर फरार झाला आहे..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपची भूमिका दुटप्पी: सुप्रिया सुळे