Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेव्हा कोरोना पसरत नाही का?, कपिल पाटील यांचा सवाल

तेव्हा कोरोना पसरत नाही का?,  कपिल पाटील यांचा सवाल
, बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (15:54 IST)
जन आशीर्वाद रॅली म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे,अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या टीकेला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना आणि राज्य सरकार पुरस्कृत रॅली आणि कार्यक्रमांना गर्दी होते. तेव्हा कोरोना पसरत नाही का?, असा सवाल कपिल पाटील यांनी केला आहे. 
 
केंद्रीय पंचाय राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा आज कल्याणमध्ये आली होती. कल्याणच्या दुर्गाडी चौकातून या यात्रेला सुरुवात झाली.या यात्रेला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. यात्रेमुळे चौकात एका बाजूची वाहतूक बंद केल्याने वाहन चालकांनानाहकचा त्रास सहन करावा लागला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.कोरोनाचे सर्व नियम पाळून जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. शिवसेना नेते आणि युवा नेत्यांच्या कार्यक्रमात मास्कही लावलेला नसतो. प्रचंड गर्दी असते.याचा अर्थ सरकार पुरस्कृत शिवसेनेच्या रॅलींमध्ये कोरोना पसरत नाही. पुण्यातील कार्यक्रमात 5 ते 10 हजार लोक जमतात.तिथे कोरोना होत नाही.भाजपने काही केले तर लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते?,असा सवाल पाटील यांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉलेजमधील मुली यांच्या रॅगिंगमुळे शिकाऊ डॉक्टरची आत्महत्या ?