सरकार बदलायच्या वेळेला घटना होत गेल्या, त्यातून कायद्याचा लोचाच निर्माण झाला, सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी स्वत: राजीनामा दिल्यामुळे रेबिया केस इथं लागू होत नाही. हे झालं नसतं तर कदाचित कोर्टाने सकारात्मक विचार केला असता, असे मत छगन भुजबळ यांनी मांडले आहे.
पुढे ते म्हणाले कि, प्रतोदचा अधिकार राजकीय पक्षाचाच आहे, तर प्रभूच प्रतोद हे मान्य केलं, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. तसेच राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती. ज्यावेळी शिंदेनी त्या सरकारचा पाठिंबा काढला, याचं पत्र राज्यपालांना दिलं नव्हतं. एकूणच अंतर्गत वादाकडे राज्यपालाचे लक्ष द्यायला नको होतं, हे देखील कोर्टाने बोललं आहे. शिवाय त्यावेळी शिवसेनेतील आमदार नाराज आहेत, म्हणजे सरकार अल्पमतात असं कुठे म्हंटलं आहे.
राज्यपालांचे सर्वच निर्णय चुकीचे होते असं म्हंटलं सुरपाम कोर्टाने म्हटले असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत . तसेच 16 जणांचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा आणि लवकर घ्यावा असं देखील त्यांनी म्हटलं आहे. महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्वत: राजीनामा दिल्यामुळे रेबिया केस इथं लागू होत नाही, हे झालं नसतं तर कदाचित कोर्टाने सकारात्मक विचार केला असता, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor