Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायकोकडे परपुरुषाने पाहू नये म्हणून तिचे टक्कल केले सोलापुरची घटना

rape
, बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (14:12 IST)
संशयामुळे सोलापुरात एका पतीने आपल्या पत्नीने परपुरुषांकडे आणि परपुरुषाने बायको कडे पाहू नये या साठी पत्नीची टक्कल करून टाकली. कलीम चौधरी असे या पतीचे नाव आहे. सदर घटना तीन महिन्यापूर्वीची आहे. काल पत्नी जेलरोडच्या ही घटना समोर उघडकीस आली. पत्नीने आपल्या बरोबर घडलेले सर्व काही सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे लग्न जोडबसवण्णा चौकातील कलीम चौधरीशी मे महिन्यात झाला होता. चौधरी कुटुंबाचा हार बनवण्याचा व्यवसाय आहे. लग्नाच्या काहीच दिवसानंतर कलीमच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळु लागला. घरची सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर पडायचे. पीडिता घरात एकटीच राहायची. तरीही कलीम बायकोवर संशय घेत असायचा. मला तुझे केस आवडत नसल्यामुळे तू टक्कल कर असे पतीने तिला सांगितले. या वर तिने मी असं काहीही करणार नाही म्हणून नकार दिला. यावरून नवऱ्याने तिच्याशी बोलणे बंद केले आणि मारहाण केली. त्रासाला कंटाळून पत्नीने टक्कल करायला होकार दिला. नंतर पतीने नाभिकाला घरीच बोलावून पत्नीचे टक्कल केले. या घटनेची माहिती पीडितेने कोणालाही दिली नाही. नंतर माहेरी एका कार्यक्रमाला लेकीला आणि जावयाला बोलवायला माहेरचे मंडळी आले तेव्हा माहेरी आल्यावर पीडितेने घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. कार्यक्रमानंतर मुलीला घेण्यासाठी संसार कडून कोणीही आले नाही. नंतर त्यांनी फोन घेणे पण टाळले. यावरून मुलीच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींच्या विरुद्ध तक्रार नोंदव्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी महिलेची विचारपूस केल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला .पोलसांनी महिलेचा जबाब नोंदवून कलीम चौधरींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोव्याच्या पर्यटन विभागा कडून माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला नोटीस