सोलापूरकरांना राज्य सरकारकडून दिवाळीची मोठी भेट मिळाली आहे. दीर्घकाळच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होणार आहे. या विमानसेवेचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. ही विमानसेवा सुरु झाल्यावर सोलापूर-मुंबई मधील प्रवास अवघ्या 50 मिनिटांत पूर्ण होणार. या मुळे प्रवाशांचा पैसे आणि वेळ दोन्ही वाचणार.
या विमानतळाच्या माध्यमातून व्यावसायिकांना, उद्योगपतींना आणि पर्यटकांना तसेच सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
या विमानसेवेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार असून ते पहिले प्रवासी असणार. हे उदघाटन समारंभ सोलापूर विमानतळावर छोटेखानी येथे होणार आहे.
ही विमानसेवा सोलापूर ते मुंबई दुपारी 12:55 वाजता प्रस्थान करेल
तसेच मुंबईहून सोलापूरला हे विमान दुपारी 2:45 वाजता प्रस्थान करेल.