Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, 'त्या' प्रकरणात ४५ जणांना अटक

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, 'त्या' प्रकरणात ४५ जणांना अटक
, मंगळवार, 18 मे 2021 (16:17 IST)
सोलापुरात सामाजिक कार्यकर्त्याच्या अंत्यदर्शनासाठी तुफान गर्दी उसळली होती. लॉकडाउन लावण्यात आलेला असतानाही इतक्या प्रमाणात झालेली गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. यानंतर सोलापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
 
सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर अंत्यदर्शनसाठी ही गर्दी जमली होती. सोलापूर पोलिसांनी यानंतर करण म्हेत्रे यांच्या घराचा एक किमीचा परिसर सील केला आहे. तसंच ४५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची चाचणी केल्यानंतर एक व्यक्ती करोनाबाधित आढळला आहे.
 
आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग केल्यामुळे पोलिसांनी २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील ४५ जणांना अटक करून रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यादरम्यान त्यांच्यातील एक जण करोना पॉझिटिव्ह आढळून आला. करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी करण म्हेत्रे यांच्या सोलापुरातील घराचा एक किमीचा परिसर बॅरिकेट्स लावून सील केला आहे. यामध्ये लष्कर, सरस्वती चौक, ताशकंद चौक, शास्त्री नगर, सिद्धार्थ चौक, अलकुंटे चौकाचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी