सातारा जिल्ह्या सुट्टीवर आलेल्या सैनिकांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आली आहे. मुळचे वाई तालुक्यातील व्याजवाडी गावातील विजय सुदाम कुदळे हे जवनाचे नाव आहे. ते सैन्यात आयटीबिपीमध्ये कर्तव्य बजावत होते. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणपतीसाठी विजय कुदळे गावी सुट्टीवर आले होते. विजय कुदळे हे आपली रजा संपवून ड्युटीवर जाणार याआधीच त्यांनी साताऱ्यातील अमरलक्ष्मी येथील प्रेरणा सोसायटीमध्ये छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही.