Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोमय्यायांना बदनामीच्या खटल्यात समन्स

सोमय्यायांना बदनामीच्या खटल्यात समन्स
, बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (08:32 IST)
शिवडी न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्यायांना बदनामीच्या खटल्यात समन्स बजावलं आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी ‘अर्थ’ या एनजीओवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.या प्रकरणी शिवडी न्यायालयाने सोमय्या यांना समन्स बजावलं आहे.न्यायालयाने सोमय्या यांना ५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश प्रवीण कलमे यांना दिले आहेत, असा आरोप केला होता. तसंच, प्रविण कलमे हे या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असा देखील आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.या प्रकरणी एनजीओचे अध्यक्ष प्रविण कलमे आणि एनजीओने सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणारी याचिका दाखल केली होती.
 
दरम्यान, कलमे यांची याचिका न्यायालयाने स्वीकारली असून त्यावर सुनावणी देखील सुरु केली आहे. न्यायालयाने सोमय्या यांना २२ सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी सोमय्या यांना खटाटोप करावा लागणार आहे. इतरांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर प्रविण कलमे यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुकेश दोषी यांची क्रिस्टल प्राईड आणि आनंद पंडित यांची लोटस डेव्हलपर्स या दोन बिल्डर्सच्या कंपन्यांसाठी सोमय्या यांनी जिवाचं रान केलं आहे.आनंद पंडित हे किरीट सोमय्या यांच्या संस्थेत पदाधिकारी आहेत.आनंद पंडित यांच्याकडून सोमय्या यांच्या संस्थेला आर्थिक मदत येते, असा आरोप कलमे यांनी सोमय्या यांच्यावर केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या