कोरोनाचे संकट काही केल्या कमी होत नसून नव्याने आलेल्या ओमायक्रॉनचा जगभराची डोकेदुखी वाढवली आहे. यातच नाशिक प्रशासनाची देखील चिंता वाढली असल्याने महापालिकेने तयारी केली आहे. यासाठी महापालिकेने १७ हजार बेडची तयारी केली असून परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात सुरू आहे; मात्र कोरोनाचा जगभरातील मुक्काम वाढत असल्याने त्याचे व्हेरिएंट निर्माण होत आहे. पहिल्या कोरोना विषाणूनंतर डेल्टाप्लसने जगभरात हाहाकार माजवला होता. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारी केली असून खाजगी आणि सरकारी अशा १७ हजार बेडसह ७५० व्हेंटिलेटर तयार ठेवण्यात आले आहेत.
नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर नाशकात परदेशातून अनेक नागरिक आले. यामध्ये २५ नोव्हेंबरपासून २८९ नागरिक आले असून यातील ८९ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र काही नागरिक नॉट रिचेबल असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रशासन या नागरिकांचा शोध घेत आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट घटक असून त्याचंगे अनेक न्यूटेशन असल्याचे समोर येत आहे. तसेच त्याचा पसरण्याचा वेग जास्त असल्याने नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरच्या वापरासह दक्षता घेणे आवश्यक असल्याचे महापालिकेने आवाहन केले आहे.