Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धुळे : "तू माझं लग्न का लावत नाहीस?" दारूच्या नशेत मुलाने आपल्या वृद्ध आईला जिवंत जाळले

महाराष्ट्र बातम्या
धुळे जिल्ह्यात लग्न न झाल्याने नाराज झालेल्या एका मुलाने आपली वृद्ध आई, जिजाबाई, यांना जिवंत जाळले. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला; पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून एक भीषण घटना समोर आली आहे,धुळे तालुक्यात, महिंदळे गावात, लग्न न झाल्याच्या वादातून एका मुलाने आपल्या वृद्ध आईवर ज्वलनशील द्रव ओतून तिला पेटवून दिले. गंभीररित्या भाजल्यामुळे उपचारादरम्यान त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.  मृत व्यक्तीची ओळख जिजाबाई भाटू खैरनार-पाटील अशी पटली आहे. 
माहिती मिळताच, धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळी पंचनामा तयार केला. फॉरेन्सिक तपासणीसाठी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे आणि ज्वलनशील पदार्थाचे अंश गोळा करण्यात आले. तातडीने कारवाई करत पोलिसांनी मुख्य संशयित, मुलगा प्रदीप उर्फ ​​दगडू खैरनार याला ताब्यात घेतले आहे.
धुळे तालुका पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध खून आणि संबंधित गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

४० वर्षीय ४ मुलांच्या आईचे १४ वर्षांच्या मुलावर जडले प्रेम, इन्स्टाग्रामवर लाइकने सुरू झाली लव्ह स्टोरी