मुंबईतील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्यी पत्नी दिपालीच्या हत्येनंतर बेपत्ता झालेला त्यांचा मुलगा सिद्धांत अखेर सापडला आहे. जोधपूर पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आपणच आईची हत्या केल्याची त्यानं कबुली दिली आहे.
‘आई-वडिलांची घरात रोज होणाऱ्या भांडणाला आपण कंटाळून गेलो होतो. त्यामुळेच आईची हत्या केल्याचं त्यानं जोधपूर पोलिसांना सांगितलं.’ हत्येनंतर सिद्धांत मुंबईहून ट्रेननं जोधपूरला गेला. दिपाली गणोरेंची राहत्या घरी निर्घृण हत्या झाली होती. मात्र, हत्येनंतर सिद्धांत बेपत्ता झाला होता.