नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करता यावा याकरिता राज्य सरकारने हॉटेल, बार व परमिटरूम व इतर आस्थापने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर, स्पीकरला रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर वेळी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, बार आणि पब्स ३१ डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
परंतु, वेळेच्या या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बनावट मद्याच्या पुरवठ्यावरही उत्पादन शुल्क विभागाची नजर राहील. तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या खासगी पार्ट्यांनासुद्धा स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.