Mumbai News : मुंबई घाटकोपर पश्चिम येथून एका भीषण अपघाताची बातमी येत आहे. घाटकोपर पश्चिम येथे भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने काही पादचाऱ्यांना चिरडले. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपरमध्ये शुक्रवारी भरधाव टेम्पोने पादचाऱ्यांना चिरडले, त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. घाटकोपर पश्चिम, मुंबई येथे शुक्रवारी एका वेगवान टेम्पोने पाच पादचाऱ्यांना चिरडले, यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, “मुंबईच्या घाटकोपर पश्चिम, चिराग नगर येथे एका वेगवान टेम्पोने पाच जणांना धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.टेम्पो चालक उत्तम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून टेम्पो जप्त करण्यात आला आहे. प्रीती रितेश पटेल 35असे मृत महिलेचे नाव आहे.