Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पाईसजेटचे मुंबई-दुर्गापूर विमान अडकले वादळात; १२ प्रवासी गंभीर जखमी

स्पाईसजेटचे मुंबई-दुर्गापूर विमान अडकले वादळात; १२ प्रवासी गंभीर जखमी
, सोमवार, 2 मे 2022 (22:18 IST)
मुंबईहून पश्चिम बंगालमधील दुर्गापूरला जाणारे स्पाईसजेटचे विमान रविवारी वादळात अडकले, त्यात विमानातील सुमारे ४० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
 
स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, वादळामुळे १८९ आसनी बोईंग ७३७ – ८०० विमानाचा अपघात झाला. विमान दुर्गापूर विमानतळावर उतरत असताना ही घटना घडली. विमानातील वादळामुळे सर्व प्रवासी घाबरले आणि केबिनमध्ये ठेवलेले सर्व सामान प्रवाशांच्या अंगावर पडले, त्यामुळे प्रवाशांना दुखापत झाली. याबाबत विमानतळ प्रशासनानेही माहिती दिली आहे. त्यानुसार, विमानात सुमारे १८८ प्रवासी होते. यातील काही प्रवाशांच्या डोक्यालाही दुखापत झाली असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
 
त्याचबरोबर सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. या घटनेबद्दल खेद व्यक्त करताना स्पाईसजेटने सांगितले की, स्पाईसजेटचे बोईंग B७३७ विमान क्रमांक SG-९४५ मुंबईहून दुर्गापूरला लँडिंग करताना वादळाचा सामना करावा लागला, ज्यामुळे दुर्दैवाने काही प्रवासी जखमी झाले. दुर्गापूरला पोहोचल्यावर जखमींना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास विमानाने मुंबईहून पश्चिम बंगालमधील दुर्गापूरकडे उड्डाण केले, मात्र २ तासांनंतर विमान दुर्गापूरच्या काझी नजरुल इस्लाम विमानतळाजवळ पोहोचताच वादळामुळे विमानाला वेग येऊ लागला. हादरे अखेर सायंकाळी ७.१५ वाजता विमान विमानतळावर उतरू शकले. विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले की, “विमान वादळाचा कसा बळी पडले, या संपूर्ण प्रकरणाची ते चौकशी करतील.”दरम्यान, घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण होते. तसेच या प्रकरणाच्या बातम्या पसरत गेल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्येही चिंता निर्माण झाली होती. परंतु, यामध्ये कोणतीही जीवित हानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकऱ्याने राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास दिला नकार