राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांची घेतली सृष्टी जगताप हिने भेट
लातूर , गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (07:49 IST)
सलग १२७ तास नृत्य करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लातूरसह देशाचे नाव नोंदवणारी लातूरची कन्या सृष्टी जगताप हिने राष्ट्रपती द्रौपदी मूमुर्् यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे यांची उपस्थिती होती. या भेटीच्या प्रसंगी देशाच्या महामहीम राष्ट्रपतींनी सृष्टीचे अभिनंदन करुन तिला तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच हा विक्रम सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याची भावनाही देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी जी मुर्मू यांनी व्यक्त केली. यावेळी सृष्टीचे वडील सुधीर जगताप व आई संजिवनी जगताप यांचीही उपस्थिती होती.
पुढील लेख