Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संपाच्या तणावातून ST चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; प्रचंड खळबळ

संपाच्या तणावातून ST चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; प्रचंड खळबळ
, बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (15:03 IST)
सध्या राज्यात एसटी महामंडळाचा संप चालू आहे. त्यातच आता एसटी विभागातील मेढा आगारातील  बसचालक संतोष वसंत शिंदे यांचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. या संपावर राज्य सरकारकडून अजून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.
 
यामुळे राज्यातील सर्व एसटी कर्मचारी प्रचंड तणावा खाली आहेत. बसचालक संतोष शिंदे हेसुद्धा मागच्या चार ते पाच दिवसांपासून संपामुळे प्रचंड तणावाखाली होते. याच तणावामुळे काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संतोष शिंदे यांच्या माघारी दोन मुले, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे. असे अनेक किती संतोष जाण्याची राज्य सरकार वाट पाहत आहे, असा सवाल जनतेकडून विचारण्यात येत आहे.
 
एसटी महामंडळ  तत्काळ शासनात विलीन करावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. कालच संपकाळातील  प्रवासी वाहतुकीच्‍या कारणावरुन सातारा आगारात कर्मचाऱ्यांच्‍या दोन गटात मोठा वाद झाला होता. या वादामध्ये डोक्याला दगड लागल्याने सातारा आगारातील वाहतूक नियंत्रक अमित चिकणे  हे जखमी झाले होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राऊतांचा कंगनाला टोला; म्हणाले – ‘त्यांना नशेचा पुरवठा कोण करतं, NCB ने तपास करावा’