Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बस चालवताना एसटी ड्रायव्हरला हार्ट अटॅक, तरीही 25 प्रवाशांचे प्राण वाचवले

ST driver pawar
, शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (08:36 IST)
पुणे-सातारा महामार्गावर एका घटनेत स्वत:चा जीव धोक्यात असताना एसटी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्यामुळे 25 प्रवाशांचे जीव वाचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सातारा हायवेवर एसटी बस सुसाट असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. बसला गती असतानाही त्याने बस बाजूला घेतली. मात्र काही वेळातच चालकाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी चालकाने दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक केलं जात आहे.
 
जालिंदर पवार असं 45 वर्षीय चालकाचं नाव आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. पुणे-सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर चालक जालिंदर पवार यांना चक्कर आली. वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळं बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचलेत.
 
याप्रकरणी बसचे वाहक संतोष गवळी यांनी नसरापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात माहिती दिली. बुधवारी वसई वरून आलेली एस बस दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात पोहचली. यावेळी बस चालक संतोष कांबळे यांना बदली चालक म्हणून जालिंदर पवार आले. बस चालकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जातीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिहार: बनावट दारूमुळे अनेकांचा मृत्यू