गेल्या साढे पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. राज्य सरकार मध्ये एसटीच्या विलीनीकरण आणि इतर मागण्या घेऊन एसटीचे कर्मचारी संपा वर बसलेले होते. आता एसटी संप संपला असून एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहे. त्यामुळे एसटी आता हळू- हळू पुन्हा आपल्या मार्गावर परतणार असून येत्या 22 एप्रिल पासून पुन्हा धावणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या अडचणी संपणार आहे. एसटी कर्मचारीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत होते. त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. त्यासाठी त्यांना दुप्पटीने पैसे मोजावे लागत होते. आता न्यायालयाच्या आदेशानुसार, एकूण 70 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. काल मंगळवारी 7,435 एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले.
एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं होते. तब्बल साढे पाच महिन्यांपासून हे आंदोलन सुरु होते. या काळात राज्यसरकारने काही कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या असून देखील कर्मचाऱ्यांचे संप सुरु होते. आता उच्च नायायालयाच्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू राहण्याचे सांगितले आहे. त्या मुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपला असून एसटी कर्मचारी आता पुन्हा कामावर रुजू होणार आणि एसटी आता पुन्हा रस्त्यावर धावणार.