राज्यात 5 ते 15 ऑगस्टदरम्यान 11 दिवस पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 31 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत उघडीप राहणार असून, काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह कोकण, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, विदर्भ, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतही हीच परिस्थिती राहील. हवामानतज्य माणिकराव खुळे यांनी सांगितले की 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत मान्सून पुन्हा ऊर्जितावस्थेत येणार आहे.